Home Breaking News तालुक्यात रेती तस्कराकडून शून्य अपघाती मृत्यू – पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले

तालुक्यात रेती तस्कराकडून शून्य अपघाती मृत्यू – पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले

220

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12मे):-रेती तस्करीचे ट्रॅक्टर उलटून किंवा अपघातामुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. हे सर्व जनतेला माहिती असताना तालुक्यात रेती तस्कराकडून शून्य अपघाती मृत्यू झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या कडून दिल्या जाते.

ब्रम्हपुरी तालुक्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून, यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यात रेती तस्करीच्या या घटनांमधून अवैध रेती वाहतूक आणि सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळू घाटावर वाळूने भरलेला रिव्हर्स घेतानी ट्रॅक्टरनी दिवानजीचा चिरडून मृत्यू झाला. 26 जानेवारीला एका विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरनी अपघात झाला. किशोरवयीन मुलगा मृत्यू पावला अशा घटना रेती तस्करीला संबंधित बातम्या न्युज पेपरला प्रकाशित झाल्या.

या घटना तालुक्यातील इतर रेती घाटावर किंवा जवळच्या परिसरात घडलेल्या असताना सन 2024 – 2025 आणि 2025 – 2026 मधील रेती तस्करी करतेवेळेस, ट्रॅक्टर, ट्रक, टिप्पर धडकेमध्ये अपघाती मृत्यू पावलेल्या लोकांची आकडेवारी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी इथून निरंक दाखविण्यात आली आहे. आता नागरिकांच्या ये – जा करण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यासाठी नागरिकांनी जागृत होवून कुणावरही विश्वास न ठेवता काळजी घेणे महत्वाचे आहे. प्रशासन रेती माफिया समोर हतबल असल्याच्या चर्चा जनतेमध्ये रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here