


✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-9168986378
नागभीड(दि.12मे):-माध्य. शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च २०२६ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत, नाशिक राव शिक्षण संस्था मोहाळी (मो.) व्दारा संचालित समता विद्यालय पाहार्णी ता. नागभीड या शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही उज्वल यशाची परंपरा कायम राखत ९६.१५ टक्के लागला आहे.
या मध्ये कु. निधी अमोल रामटेके व कु.सम्रूध्दी तुलशिदास मारबते यांनी ८० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला तर कु. मयुरी मोरेश्वर गिरोले ही ७९.२० टक्के मिळवून व्दितीय तर कु. शिवाजी राजकुमार राऊत ही ७७.८० टक्के मिळवून तृतीय आली. शाळेच्या या निकालात प्रावीण्य श्रेणीत ०४ प्रथम श्रेणीत १२ व्दितीय श्रेणीत ०५ तर पास श्रेणीत ०४ विद्यार्थी पास झाले.
या शाळेतील सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून कुठल्याही प्रकारची खाजगी शिकवणी न लावता विद्यार्थी व शिक्षक यांच्या कठोर परिश्रमाचे फलीत होय. यावर, शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाही. अशी या परिसरात चर्चा आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक तथा कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.














