


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.20एप्रिल):-राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित प्रश्न, रखडलेले वेतन आणि प्रशासनाच्या असंवेदनशील धोरणांच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनाच्या वतीने आज परभणीत ही शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ढोल-बजाव आंदोलन आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्व-ाखाली करण्यात आले.
असून, स्थानिक पातळीवर शिक्षकसेनेचे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. प्रशासनाच्या विलंबामुळे हजारो शिक्षक आर्थिक व मानसिक अडचणीत सापडले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न न सुटल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. यामध्ये अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व वेतन, थकित देयके तात्काळ देणे, बी.एल.ओ. कामातून मुक्ती, मार्च महिन्याचे रखडलेले वेतन देणे, परीक्षा काळात पटपडताळणी टाळावी, विनाअनुदानित शाळांबाबत निर्णयाचा पुनर्विचार, २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, जीपीएफ व वैद्यकीय बिले तातडीने मंजूर करणे, प्रलंबित पदोन्नती व श्रेणी प्रस्ताव निकाली काढणे आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्या.
यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव हरकळ, दिगंबर मोरे, सायस चिल्लगर, सुनील काकडे, सतीश कांबळे यांच्या सह या आंदोलनात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षण कर्मचारी महासंघ, डॉ. पंजाबराव शिक्षक परिषद, कास्ट्राईब मागासवर्गीय कर्मचारी संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आदर्श प्राथमिक शिक्षक संघ, जनसुराज्य शिक्षक संघटना, कंत्राटी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघर्ष समिती, आदीनी आपला सहभाग नोंदवला.














