


✒️अनिल साळवे(विशेष प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.17एप्रिल):-(१५/०४/२०२६) येथिल म.फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कृष्ण नगरच्या वतीने गोल्डन ड्रीम्स इंग्लिश स्कूल येथे “अखंड राष्ट्र निर्मितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान”, या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रो.डॉ.आनंद इंजेगावकर यांनी वरील वक्तव्य केले.
या कार्यक्रमाची सुरुवात म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन व बुद्ध वंदनेने झाली. डॉ.इंजेगावकर पुढे असे म्हणाले की, प्रबोधना शिवाय परिवर्तन अशक्य आहे. आंबेडकरी चळवळीचे यश-अपयशाला बुद्धिजीवी वर्ग जबाबदेही आहे. असे मार्मिक विधान ही त्यांनी केले.
राष्ट्राच्या निर्मितीची रचनाच संविधानात आहे व संविधानाची उद्देशिका अखंड राष्ट्राचा सरनामा आहे. आरक्षण म्हणजेच नवराष्ट्र निर्माण होय. आरक्षण हे संविधानातून आले आहे. समाजातील सगळे घटक प्रवाहात आले तरच राष्ट्राची निर्मिती होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती की, ते भारताच्या प्लानिंग कमीशन मध्ये असावे. बाबासाहेब म्हणायचे, भक्तांपासून सावध रहा. क्रांतिची पूजा केल्याने क्रांति होत नसते. शिकलेले लोक क्रांति करतील असे म्हणने चुकीचे आहे. त्यासाठी इमानदार आणि निष्ठावान माणसं लागतात. बाबासाहेबांच्या आंदोलनाचे फलित म्हणजे संविधान आहे. भारतातील सर्व जाती, धर्म, वंश, पंथ, धर्म यांना जोडणारे एक मात्र सूत्र संविधान आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग आणि बलीदानातून आम्हाला मानासन्मानाचे जीवन मिळाले आहे. बाबासाहेबांमधे बुद्ध, संत कबीर, छ.शिवराय, म.फुले, छ.शाहु सामावले आहेत. ६६ नोबेल पुरस्कार विजेता हे बुद्धाला गुरु मानतात. इंजेगावकर यांनी पुढे असे आवाहन केले की, बाबासाहेब जन्माला येत नसतात तर ते संस्काराने निर्माण करावे लागतात. भीमरावांना कुटुंबातील सगळे साहेब म्हणायचे म्हणून ते साहेब घडले व जगाचे साहेब झाले. सोशल मीडिया वर भावनिक होऊन कोणती ही पोस्ट करु नका असेही ते म्हणाले. मुलाना मोबाइल पासून दूर ठेवा. रमाबाईला बीमारी पासून बाबासाहेब वाचवू शकले नाही. ते रमाबाईला म्हणायचे, “रामू माझ्या समाजाला अज्ञानाचा आजार आहे. तो दुरुस्त करण्यासाठी मी एकच डॉक्टर आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संत जनाबाई महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख म्हणाले की, बाबासाहेब डोक्यावर न घेता डोक्यात घेणे गरजेचे आहे. नाचून नाही तर वाचून मोठे झाले पाहिजे. आम्ही महापुरुषांचे विचार आचरणात आणल्या शिवाय समाजाची प्रगती व आखंड राष्ट्राची निर्मिती होणे असंभव आहे. त्यांनी आपल्या ओघवत्या हिंदी भाषेच्या विशिष्ट शैलीतून श्रोत्यांची मने जिंकली व खालील काव्यांनी समारोप केला.
“भीमा सम झाला नाही कधी न होणार।
नांव तयाचे गाजत राही सदा हो जग भर।।
प्रज्ञा सूर्य जन्मा आला उद्धार आमचा करण्याला।
वाहतो आम्ही श्रध्दा सुमने तयांच्या चरणाला।।”
कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन दिल्या बद्दल गोल्डन ड्रीम स्कूलच्या प्राचार्या सौ.कविता साळवे व सेवा निवृत्त प्राचार्य प्रा.मारोती साळवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १४ एप्रील रोजी महु येथे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन आलेल्या महिलांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवि-कथाकार दुर्गानंद वाळवंटे, सूत्र संचलन बहारदार काव्य शैलीतून भीम शाहीर भगवान गायकवाड़ यांनी केले व आभार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष मुंजाजी कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितिचे अध्यक्ष:ज्ञानोबा ग्वाले, सचीव: चंद्रगुप्त घनसावद, उपाध्यक्ष: वाल्मीक भालेराव, कोषाध्यक्ष: वैजनाथराव शिंदे, कार्याध्यक्ष: संताराम गायसमुद्रे साहेब. कार्यवाहक: शा.भगवान गायकवाड यांनी आयोजन केले.
प्रा.डॉ.अनिल सिंगारे, प्रा.डॉ.एम.डी.इंगोले, मा.प्रचार्य मारोतराव साळवे, यशपाल चावरे, प्रा.डॉ.संतोष गायकवाड, एम.बी.गोटमुकले, आर.जी.मस्के, सेवा निवृत्त पी.आय.लक्ष्मणराव कांबळे, डॉ.गुणवंत जीतकर साहेब, दुर्गानंद वाळवंटे, शिवराज चव्हाण, सचिन भालेराव इत्यादिंनी जयंती उत्सवासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने बुद्धिजीवी वर्ग उपस्थित होता.














