


▪️महावितरण-डीपीच्या बाजूला दुकान काढणे धोक्याचे..
✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.13एप्रिल):-शहरातील योगेश्वर कॉलनी मध्ये अनेक दिवसापासून मारुती मंदिर असून या परिसरातील भाविक फक्त दैनंदिन पूजा करत असतात परंतु मंदिर परिसरातच काही व्यक्तींनी वैयक्तिक फायद्यासाठी व्यवसायाकरिता दुकान बांधण्याचा विचार केला आणि संबंधित जागेवर सुरुवातही केली त्यामुळे नगरपरिषद जागेवर अतिक्रमण होत असल्यामुळे नगरसेवक यांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी 13 एप्रिल रोजी नगर परिषद अधिकारी यांच्याकडे केली आहे.
योगेश्वर कॉलनीतील मंदिर परिसरात महावितरणचा डीपी असल्यामुळे नागरिकांच्या जीवित आस धोकाही होऊ शकतो त्यामुळे लवकरात लवकर अतिक्रमण हटवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेवक चंद्रकांत खंदारे प्रभावती सुरेश मुंडे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.














