


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.13एप्रिल):- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नारीशक्ती महिला प्रभाग संघ मासळ यांचे आर्थिक साहाय्य तसेच PMFME 35%सबसिडी मधून 100000 लाख रुपये उचल करून गावामध्ये शेवई तयार करणे जेणेकरून महिलांना याचा लाभ मिळेल व महिलांना त्यामधून आर्थिक साह्य मिळेल तसेच दिवसेनदिवस महिला ह्या आधुनिक पद्धतीने पापड लोणचे बनवीत असतात. त्याकरिता महिलांचा वेळ वाचावा व त्यांना कमी वेळेत जास्त उत्पन्न मिळावे. याकरिता लिज्जत पापड मशीन घेऊन व्यवसाय करण्याचे सातारा येथील सौ. वंदनाताई जांभुळे यांनी ठरविले. आज मोठया थाटात उदघाटन सोहळा पार पडला.
या प्रसंगी कु. सविता उईके प्रभाग समन्वयक आणि नारीशक्ती महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष सौ. वर्षाताई राजू नन्नावरे यांनी लिज्जत पापड व शेवई मशीन चे रिबीन कापून उदघाटन केले. उपस्थित कृषी सखी जया रामटेके, ग्रामसंघाचे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या. या व्यवसायामुळे महिलांना खूप मदत होईल व त्याची मेहनत व वेळ वाचेल. अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली.














