Home महाराष्ट्र जांभुळघाट येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद 

जांभुळघाट येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद 

74

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11एप्रिल):-महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.

       महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा, जांभुळघाट येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजीत करण्यात आले होते. सदर शिबीराचे अध्यक्षस्थानी भिसीच्या अपर तहसीलदार श्रीमती निलीमा रंगारी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार श्रीधर राजमाने उपस्थित होते.

      या शिबिरात प्रामुख्याने आधार कार्ड, संजय गांधी योजना प्रमाणपत्र, अधिवास, जात, उत्पन्न, राशन कार्ड, विविध दाखले, इतर विभागांचे लाभार्थी यांना शासकीय योजना विषयक लाभाचे वाटप करण्यात आले. भूमी अभिलेख विभागाकडून सनद वाटप करण्यात आले. तालुका कृषी विभागाकडून पी.एम. कीसान लाभार्थी व इतर प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणामध्ये अपर तहसिलदार श्रीमती निलीमा रंगारी यांनी आयोजीत करण्यात आलेल्या शिबीराचा सर्व नागरीकांनी लाभ घेण्याबाबत आवाहन केले. तर कार्यक्रमाच्या प्रस्तावने मध्ये सदर शिबीरामध्ये देण्यात येणा-या विविध विभागाच्या योजनेची माहिती तहसिलदार श्रीधर राजमाने यांनी दिली. तसेच सहा. आयुक्त पशुसर्वधन व दुग्धविकास अधिकारी डॉ. आर.एल.ओव्हाळ, सहा. प्रकल्प अधिकारी एम.व्ही. डुले व उप अधिक्षक भुमी अभिलेख कावळे साहेब यांनी आपल्या विभागाबाबत माहितीचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात जांभुळघाट मंडळातील प्रतिष्ठीत नागरीक, ग्रामस्थ तसेच चिमुर तालुक्यातील इतर प्रशासकीय विभाग प्रमुख व चिमूर तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार, सुर्यकांत पाटील जांभुळघाट मंडळातील मंडळ अधिकारी रंजना ढोले, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, महसूल सहाय्यक तसेच विविध योजनाचे लाभार्थी, ईत्यादी मोठ्या संख्यने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता चौधरी, ग्राम महसूल अधिकारी यांनी केले आणि आभार प्रदर्शन प्रफुल मेश्राम, महसूल सेवक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here