Home Breaking News भंडारा, जवाहरनगर आणि तुमसरमधील चोऱ्यांचा पर्दाफाश

भंडारा, जवाहरनगर आणि तुमसरमधील चोऱ्यांचा पर्दाफाश

261

▪️७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

✒️रोशन मदनकर(उप संपादक )

भंडारा(दि.11एप्रिल):-भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत, जिल्ह्यासह नागपुरात दुकानांचे शटर फोडून चोऱ्या करणाऱ्या एका टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने भंडारा शहर, तुमसर आणि जवाहरनगर परिसरात धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी एका मुख्य आरोपीसह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ७९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 सविस्तर तपशील भंडारा जिल्ह्यातील तीन शहरांत सलग दोन दिवस झालेल्या चोऱ्यांच्या प्रकरणी खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ज्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे:

भंडारा शहर पोलीस स्टेशन: अपराध क्र. ८२८/२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ (अ)).

 जवाहरनगर पोलीस स्टेशन: अपराध क्र. १७४/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४), ३०५ (अ)).

 तुमसर पोलीस स्टेशन (पहिली घटना): अपराध क्र. ५३९/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ)).

 तुमसर पोलीस स्टेशन (दुसरी घटना): अपराध क्र. ५४०/२०२६ (भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ)).

दिनांक ८ आणि ९ एप्रिलच्या रात्री झालेल्या या धाडसी चोऱ्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही शहरातील घटनास्थळांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज गोळा केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने ही टोळी नागपूरच्या वाडी परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीच्या प्रॉपर्टी पथकाने दोन दिवस नागपुरात तळ ठोकून पाठलाग केला आणि मुख्य आरोपी सम्यक उत्तम वाटोडे (१८ वर्षे, रा. आंबेडकर नगर, वाडी, नागपूर) याच्यासह चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.

पकडलेल्या आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी फरार आरोपी संतोष उर्फ कालु नागदेवे आणि चिंटू उईके यांच्या मदतीने शटर तोडून या चोऱ्या केल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा माल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य असा एकूण ७९,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही टोळी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातही सक्रिय असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, स.पो.नि. विवेक सोनवणे, पो.हवा. प्रदीप डाहारे, सतीश देशमुख, पो.शि. चेतन पोटे, सचिन देशमुख, शुभम ठाकरे, आशिष तिवाडे आणि कौशिक गजभिये यांनी ही यशस्वी कामगिरी केली. पुढील तपासासाठी आरोपींना तुमसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

—————————–

गुन्ह्याचा छडा लावण्यात सीसीटीव्ही फुटेजची मोठी मदत झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी आवाहन केले आहे की, “व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या प्रतिष्ठानांमध्ये व घरी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे होईल.”

नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here