


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.10मार्च):-ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौगान ता. ब्रम्हपुरी येथे जागतिक महिला दिन हा कार्यक्रम खूप उत्साहाने आणि आनंदाने पार पडला.
कार्यक्रमांमध्ये उपविभागीय अधिकारी मॅडम यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सोबतच महाविद्यालयातील सर्व महिला कर्मचारी यांना सुद्धा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आलेला होता.
स्त्री ही केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नसून ती समाजाची आणि राष्ट्राची शक्ती आहे. आई, बहीण, मुलगी, पत्नी अशा अनेक भूमिकांमध्ये स्त्री आपले कर्तव्य अत्यंत निष्ठेने पार पाडते. घर सांभाळण्याबरोबरच आज स्त्रिया शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, उद्योग अशा सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, कल्पना चावला, मेरी कोम यांसारख्या अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या संघर्षातून आपल्याला हे शिकायला मिळते की, संधी मिळाल्यास स्त्री कोणतेही शिखर गाठू शकते.
यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रह्मपुरी विभागातील पर्वणी पाटील मॅडम उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शन लाभलेले होते सोबतच मा. निहाटे सर, व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांच्या विचारावर आणि कार्यांवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन ख़ुशी सहारे तर आभार प्रदर्शन रिया मेश्राम या विद्यार्थिनींनी केला. सोबतच महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य प्रधान मॅडम, मैंद मॅडम, कांबळे मॅडम, मेश्राम मॅडम, राधा मॅडम, बारसागडे मॅडम, खरकाटे मॅडम, प्रधान मॅडम, सेलोटे मॅडम, प्रधान सर, दोनाडकर सर, दयाल सर, तलमले मॅडम, पिलारे मॅडम, मेश्राम बाई, यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिन संपन्न झाला.














