Home महाराष्ट्र “रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

138

▪️धरणगावात शिवजयंतीनिमित्त भव्य व्याख्यान; शिवरायांच्या कार्याचा प्रभावी उलगडा

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.10मार्च):-येथील कोट बाजार परिसरातील साने पटांगण येथे शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित भव्य व्याख्यान कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रख्यात व्याख्याते लक्ष्मणराव पाटील हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. आपल्या ओघवत्या व अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीपूर्ण कार्यपद्धतीचा वेध व विविध ऐतिहासिक माहिती श्रोत्यांसमोर उलगडून सांगितली.

पाटील यांनी सांगितले की, छ. शिवराय हे शूर योद्धे तर होतेच, तर एक कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते आणि रयतेचा खरा राजा होते. त्यांच्या शासनपद्धतीत कृषी धोरण, पर्यावरणाबाबत जागरूकता, सक्षम राजकीय व्यवस्था, महिलांचा सन्मान, तसेच जलसिंचन व जलसंधरणाला विशेष महत्त्व दिले गेले. शिवरायांच्या या सर्वांगीण कार्यामुळे स्वराज्याची भक्कम पायाभरणी झाली. “रयतेच्या मनात कायमचे कोरले गेलेले इतिहासातील स्वर्णिमं पान म्हणजे शिवराय,” असे प्रभावी प्रतिपादन श्री. पाटील यांनी शेवटी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण अग्निहोत्री यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात उपनेते गुलाबराव वाघ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यानांसाठी अनेक व्याख्याते मोठ्या मानधनाची अपेक्षा करतात.

मात्र धरणगावचे लक्ष्मणराव पाटील हे सरस आणि अभ्यासू व्याख्याते असूनही “जेथे पिकतं तेथे विकलं जात नाही” ही म्हण त्यांच्या बाबतीत लागू पडते, असे प्रतिपादन श्री. वाघ यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा सौ. लीलाताई चौधरी, माळी समाजाचे उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील, सत्यशोधक समाजाचे विधिकर्ते शिवदास महाजन, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक भागवत चौधरी, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, नगरसेविका सौ. प्रमिलाबाई शिरसाट, हेमांगी अग्निहोत्री, ज्योती पाटील, भारती महाजन, तसेच एरंडोल येथील प्रल्हाद महाजन व कविराज पाटील यांसह जेष्ठ पत्रकार कडूजी महाजन, विनोद रोकडे, शेरू शेख, हेमंत माळी, गोरख देशमुख, गजानन महाजन, रमेश चव्हाण, भानुदास मराठे, राजेंद्र वाघ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत शिकरवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहरप्रमुख तथा नगरसेवक भागवत चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here