Home महाराष्ट्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ मार्चपर्यंत UDID पोर्टलवर eKYC करणे अनिवार्य

दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ मार्चपर्यंत UDID पोर्टलवर eKYC करणे अनिवार्य

133

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.7मार्च):-तुमसर तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची UDID पोर्टलवर eKYC करून ते आधारशी संलग्न करणे अनिवार्य असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याने आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची UDID पोर्टलवर eKYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी आपले दिव्यांग प्रमाणपत्र UDID पोर्टलवर eKYC करून आधारशी संलग्न करणार नाहीत, त्यांचे दिव्यांग पेन्शन तात्काळ बंद करण्यात येईल, तसेच याबाबतची जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ मार्च २०२६ पर्यंत आपले आधार eKYC तसेच दिव्यांग प्रमाणपत्राचे आधार प्रमाणीकरण जवळच्या महा ऑनलाइन सेवा केंद्र, सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालय, तुमसर येथे जाऊन करून घ्यावे, असे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही माहिती तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे यानी सर्व संबंधित लाभार्थ्यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here