Home महाराष्ट्र धारासुरच्या ग्रामस्थानी घेतली विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची भेट

धारासुरच्या ग्रामस्थानी घेतली विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची भेट

109

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.5मार्च):-तालुक्यातील धारासुर येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह बांधकामासाठी ग्रामविकास निधीतून निधी मंजूर करण्यात यावा,अशी मागणी येथील ग्रामस्थानी केली आहे.जय मल्हार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांच्यासह धारासुरचे माणिक शिंदे,सतीश वाळवटे,निवृत्ती कदम,नवनाथ कोल्हेकर,माधव चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.राम शिंदे यांनी ग्रामविकास मंत्र्यांना पत्र पाठवून धारासुर येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह’साठी निधी मंजूर करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

त्यांच्या पत्रानुसार ग्रामविकास मंत्र्यांनी सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी बांधकाम विभागाकडे पाठविला आहे.दरम्यान,प्रस्तावित सभागृहासाठी निधी तातडीने मंजूर व्हावा यासाठी धारासुर ग्रामस्थांनी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची विनंती गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांना निवेदनाद्वारे केली आहे.गावातील सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची अत्यंत गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यामुळे या मागणीस लवकरात लवकर सकारात्मक प्रतिसाद मिळावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here