Home महाराष्ट्र राज्यघटनेच्या कलम 171 अनुसार राज्यपाल आमदार नियुक्तीत दिव्यांग, समाजसेवक ,पत्रकार यांना प्राधान्य...

राज्यघटनेच्या कलम 171 अनुसार राज्यपाल आमदार नियुक्तीत दिव्यांग, समाजसेवक ,पत्रकार यांना प्राधान्य द्या !..समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रातर

65

▪️दिव्यांग,पत्रकार,समाजसेवक यांना विधानपरिषदेत राज्यपाल नियुक्त प्रतिनिधित्व का नाही?

राजकीय पक्षातील राजकीय पुढारीच राज्यपाल नियुक्ती प्रतिनिधित्व करू शकतो का?.

•असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रपती, पंतप्रधान,राज्यपाल व मुख्यमंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन. 

✒️संजीव भांबोरे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

भंडारा(दि.23फेब्रुवारी):-भारतीय राज्यघटनेच्या नुसार .कलम 171 नुसार विधान परिषदेचे १२ आमदार राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात विविध क्षेत्रातून शिफारस यानुसार नियुक्ती केले जाते .परंतु या राजकीय कारकिर्दीत अध्यपत्याखाली तसे दिसून येत नाही. काय राजकीय अवधूत राज्यपालाच्या नीतीमुळे कित्येक काळ प्रलंबित झाले आहे . या विरुद्ध काही राजकीय पक्षांनी न्यायालयत याचिका सुद्धा दाखल केली आहे. व सदर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेची रचना विधानसभेपेक्षा एक वेगळी आहे. 

हे सभागृह दर ५ वर्षांनी विसर्जित होत नाही. सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. एकूण ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडून येतात. शिक्षकांमधून ७ आणि पदवीधरांमधून ७ सदस्य निवडले जातात. तर १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांतून करतात.

 याच राज्यपाल कोट्यातील ५ जागा सध्या रिक्त असून, ७ जागा महाराष्ट्रात राज्यपालने ऑक्टोंबर 2024 मध्ये,चित्रा वाघ,विक्रांत पाटील,धर्मगुरू बाबुसिंग राठोड,पंकज भुजबळ,इंद्रीस नायकवाडी,हेमंत पाटील आणि मनीषा कायदे.या राजकीय पुढाऱ्यांना शिफारसीनुसार राज्यपालद्वारे नियुक्ती करून शपथ विधी देण्यात आली.परंतु दिव्यांग, समाजसेवक, पत्रकार या समाजिक क्षेत्रातील लोककल्याण करणारा एकही प्रतिनिधित्व नाही काय?.असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिव्यांगाच्या व पत्रकारांच्या कल्याणासाठी फक्त राजकीय पुढारीच किंवा राजकीय पक्षाच्या मताधिक्य तसेच शिफारसी नुसारच निवडले जावे का?.. असा प्रश्न निर्माण होतो. 

याच राज्यपाल कोट्यात सध्या पाच जागा रिक्त असून त्या लवकरच नियुक्त करण्याची शक्यता असल्यामुळे दिव्यांग पत्रकार समाजसेवक क्षेत्रातील उत्कृष्ट सेवकांची समाज कल्याण विभाग जिल्हाधिकारी द्वारे तालुका निहाय सर्वे करून, यादी निरूप उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठ दिव्यांग पत्रकार समाजसेवक क्षेत्रातील सेवकांना राज्यपाल अधिकारांतर्गत विधान परिषद प्रतिनिधित्व नियुक्ती करावे.

असे निवेदन समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार संस्थापक अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना यांनी निवेदन ई-मेल द्वारे राष्ट्रपतींना.पंतप्रधान राज्यपाल व मुख्यमंत्री यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here