


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.23फेब्रुवारी):-मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून सर्वत्र श्रद्धा,भक्तीचे वातावरण आहे.या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव ३० दिवस उपवास (रोजा) ठेवून अल्लाहची इबादत करतात.सध्या वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे मोठ्यांनाही त्रास होत असताना,गंगाखेड शहरातील बळीराजा कॉलनी येथील अवघ्या नऊ वर्षांच्या अफानने आपल्या जिद्दीच्या बळावर आयुष्यातील पहिला व रमजान महिन्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.कौडगाव येथील टेलर महेबुब कठाळू शेख यांचे नातू व पत्रकार महेमूद महेबुब शेख यांचा मुलगा अफानने (दिनांक १९ फेब्रुवारी गुरुवार) रोजी पहाटेपासून रोजा ठेवण्याचा निर्धार केला.पहाटे ५:३० वाजता सहेरी (फराळ) करून त्याने रोज्याची सुरुवात केली आणि सायंकाळी ६:३३ वाजता इफ्तारपर्यंत सलग १३ तास अन्नाचा एक कणही न घेता तसेच पाण्याचा थेंबही न पिता रोजा पूर्ण केला.
लहान वयात दाखवलेली ही धार्मिक निष्ठा,संयम आणि आत्मविश्वास पाहून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.अफानने पहिला रोजा पूर्ण केल्याचा आनंद कुटुंबियांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.आजोबा महेबुब कठाळू शेख(टेलर),वडील महेमूद शेख (पत्रकार),आई माहिन महेमूद शेख,काका हबीब शेख,मकसूद शेख,इमाम शेख,साजिद शेख,आजोबा अश्रफ शेख,मामा अशपाक शेख तसेच संपूर्ण कुटुंबियांनी अफानला नवीन कपडे देऊन,पुष्पहार घालून मिठाई भरवून त्याला आशीर्वाद दिले.यावेळी मस्जिदमध्ये तसेच शेजाऱ्यांना फळांची इफ्तारी वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.एवढ्या लहान वयात दाखवलेली अफानची जिद्द आणि धार्मिक निष्ठा पाहून परिवार व नातेवाईकांकडून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.














