


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.22फेब्रुवारी):-इंग्रजी माध्यमांच्या शाळेचा वाढता प्रभाव यामुळे ग्रामीण भागात देखील कॉन्व्हेन्ट संस्कृतीचा झालेला उदय यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेची रोडावत चाललेली पटसंख्या, यामुळे कित्येक जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत.
यावर आळा घालण्याचे उद्देशाने व जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या वाढ व्हावी या हेतूने, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत सन 2025-26 ह्या सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगलवाडी येथे इयत्ता पहिलीत आपल्या मुलांना प्रवेशित करणाऱ्या पालकांचा सन 2025-26 ह्या वर्षाचा कर 100% माफ करून शिवजयंतीच्या शुभ पर्वावर या सर्व पालकांचा सत्कार, मा. सरपंच विवेक बनकर, उपसरपंच श्री. धनंजय बावणे, ग्रामपंचायत सदस्य श्री संजय भोयर, श्री. नितीन चौधरी, सौ, हिरकण्या कोसे, सौ मालन मशाखेत्री, पो.पा श्री नलेष भोयर, श्री रामटेके सर, मुख्याध्यापक यांचे हस्ते,ग्रामपंचायत अधिकारी श्री. संजीव ठाकरे यांचे पुढाकारातून, गट विकास अधिकारी श्री. रवींद्र घुबडे यांचे मार्गदर्शनातून पार पडला. या प्रसंगी, गावातील नागरिक, पालक,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेच्या पट संख्या वाढ होण्याकरिता घेण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल तालुक्यात सगळीकडे कौतुक होत आहे.














