Home महाराष्ट्र सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी येथे चिंतन दिनाच्या निमित्ताने सर्व धर्मीय प्रार्थना सभा...

सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी येथे चिंतन दिनाच्या निमित्ताने सर्व धर्मीय प्रार्थना सभा आणि शिवजन्मोत्सव साजरा 

598

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.22फेब्रुवारी):-दिनांक 21 फेब्रुवारी 2026 ला डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी येथे स्काऊट-गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व स्वराज्यसूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्तिक जयंती निमित्त सर्व धर्मीय प्रार्थना सभा व गीत पोवाडे नाटिका यांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला पी.आर. मेश्राम अध्यक्ष, वाय. आर मेश्राम साहेब प्रमुख अतिथी , व्ही.पी. मेश्राम साहेब प्रमुख अतिथी म्हणून लाभले. आद. वाय. आर मेश्राम साहेब स्काऊट -गाईड तथा माजी जिल्हा प्रशिक्षक आयुक्त स्काऊट गडचिरोली यांनी स्मरण सरस्वती, गुरुर्ब्रह्मा, जय भोले प्रार्थना, वुई शॉल ओवर कम, भारतात बंधुभाव अशा विविध गायन करून विद्यार्थ्यांना मनावर प्रतिबिंबित केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यक्रमानिमित्त निमित्त भाषण,नाटक, पोवाडा, नृत्य घेण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष पी.आर. मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणाने मंत्रमुग्ध केले. शाळेचे मुख्याध्यापक एस. वाय. मेश्राम , सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमा निमित्त अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here