Home Breaking News लिहिता हात शाबूत आहे..हल्लेखोर व सूत्रधाराचे आभार:ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत...

लिहिता हात शाबूत आहे..हल्लेखोर व सूत्रधाराचे आभार:ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मनोगत !!

246

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

आज माझ्यावरील हल्ल्याला 13-14 दिवस झाले. पोलिसांनी दोन हल्लेखोर शिताफीने पकडले. त्यांना पाच सहा दिवस पोलीस कोठडिही मिळवली.

या कालावधीत तिसऱ्या हल्लेखोराचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांनी हल्ल्यात वापरलेली स्कूटरही हाती लागली नाही. माझ्या हातातील ब्रेसलेट ज्याची किंमत आजच्या बाजार भावाने तीन लाख आहे त्याचाही शोध लागलेला नाही. 

या काळात सूत्रधार मोकाट फिरत आहेत.काल न्यायालयात पाच सहा वकिलांची फौंज कोणाच्या बचावासाठी आली होती? . सरिता खानचंदानी प्रकरणातील सर्व वकील त्यात होते. मी निवडणूक काळात जेव्हा बोडारे विरोधात लेख लिहिला होता तेंव्हा धनंजय बोडारे समर्थक भोसले याने निवडणुकीनंतर भेटू अशी धमकी दिली होती. हल्ल्याच्या वेळे दरम्यान एक बोडारे समर्थक पदाधिकारी त्याच रस्त्यावर दिसत आहे. या हल्ल्यातील एक हल्लेखोर केरळ येथे लपविण्यात येऊ शकतो. बोडारेचे केरळशी काय नाते आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्यादृष्टीने तपास झाला पाहिजे. राजकीय दबाव असेल तर तो झूगारता आला पाहिजे.

या प्रकरणाचा तपास भरकटावा म्हणून काही लोक मला रमेश चव्हाण व नीलम कदम बोडारे यांचे नाव सुचवीत आहेत. माझा रमेश व नीलमवर अजिबात संशय नाही. राजकारणात पोरं बाळीना गुंतवण्याचा नालायकपणा मी कधीच करणार नाही.

पोलीस व न्यायालय मला न्याय देईल अथवा देणारही नाहीत. परंतू माझा कुदरात का कानून व नियतीच्या न्यायावर माझा ठाम विश्वास आहे. जो कोणी सूत्रधार आहे, त्याला नियतीच कठोर शिक्षा देईल व ती ही तीन महिन्यांच्या आत, याची मला खात्री आहेच.ते सर्वांना दिसेलच.

दरम्यान माझ्या खांद्यावरील हाडाला जे फ्रॅक्चर झाले आहे त्याचा काल पुन्हा xray काढला असता तीन ठिकाणी fracture दाखवले असून खांदा निखळला असल्याने ऑपेरेशन शिवाय पर्याय नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. आवश्यक चाचण्या झाल्या नंतर पुढील काही दिवसात ऑपरेशन करावे लागेल. माझे चाहते व हितचिंतक रोजच्या रोज भेटून व फोनवर आस्थेने चौकशी करीत आहेत., त्यांचा मी ऋणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here