Home महाराष्ट्र राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन यावर्षी तेलंगण स्टेट मधील गोयेगाव (मंडल- केरामेरी)येथे 

राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन यावर्षी तेलंगण स्टेट मधील गोयेगाव (मंडल- केरामेरी)येथे 

136

✒️आसिफाबाद(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

आसिफाबाद(दि.23जानेवारी):-राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि तेलंगण स्टेट मधील श्रीगुरुदेव सेवा मंडळ गोयेगाव, निशानी, सावरखेडा, खैरी,सांगवी शाखांच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव ( मंडल -केरामेरी), जि‌.आसिफाबाद (तेलंगण स्टेट) येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समितीचे हे २० वे दोन दिवसीय आंतरराज्य संमेलन असून शनिवार दि. ७ फेब्रुवारी व रविवार दि. ८ फेब्रुवारीला गोयेगाव च्या जि.प. शाळेच्या प्रांगणात होणार आहे.

स्थानिक सर्व ग्रामस्थ, भजन मंडळी, युवक , महिला मंडळाच्या सहकार्याने सदर संमेलन होणार असून या संबंधीची महत्त्वाची सभा गोयेगाव येथे नुकतीच संपन्न झाली. साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, विशेष पुरस्कार वितरण, परिसंवाद , प्रबोधन संध्या, खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम, सामुदायिक ध्यान व प्रार्थना, योग प्राणायाम मार्गदर्शन , स्वच्छता अभियान, श्रमदान, अनुभवकथन, समारोप आदी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. 

          या संमेलनाचे सुक्ष्म नियोजन समितीचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊ पत्रे , चिटणिस ॲड.राजेंद्र जेनेकर, येमाजी गावतुरे , रमेश सोनुले, उपाध्यक्ष ईंजी.विलास उगे, डॉ. श्रावण बानासुरे, श्रीकांत धोटे, संजय वैद्य (वरोरा) समन्वयक पांडुरंग शेंडे , मोतीराम नागोसे , विलास चौधरी , देवराव कोंडेकर, धम्ममित्र नामदेव गेडकर ,संयोजक शंकर आदे, नामदेव कुळसंगे, तुळसाबाई गुरनुले, गोविंदराव शेंडे, लिलाबाई आदे,सोमा सोनुले , वामनराव मोहुर्ले, चंद्रकला पारडी, शामलाबाई मोहुर्ले आदी मंडळी करीत आहेत.

संमेलनात राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक, प्रबोधनकार, लोक कलावंत मंडळी, प्रचारक , लेखक सहभागी होणार आहेत.

संमेलन स्थळ गोयेगाव हे के.बी. आसिफाबाद (तेलंगण स्टेट) जिल्ह्यात असून आसिफाबाद – केरामेरी – आदिलाबाद या मार्गावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here