


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.7डिसेंबर):-भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते जागतिक मानवतावादाचे मार्गदर्शक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गंगाखेड शहरात (दिनांक 6 डिसेंबर शनिवार) रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.शहरातील सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था तसेच पत्रकार ,विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी सकाळी उपस्थित राहून शहरातील डॉ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन ठेवून बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण केले.
बाबासाहेबांनी समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी आयुष्यभर लढा दिला. भारतीय संविधानातून त्यांनी दिलेली समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आजही समाजाला नव्या दिशेची अनुभूती देतात. त्यांच्या विचारांचे आचरण करूनच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो, असे वक्त्यांनी नमूद केले.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी भावना व्यक्त करत म्हटले
“मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची.तू देव नव्हतास,तू देवदूतही नव्हतास,तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास.महासूर्याला विनम्र अभिवादन! माणसाला माणूसपण दाखवणाऱ्या महामानवाला महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम.महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात दिवसभर अनुयायांनी शांतता,शिस्त मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले














