


✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
▪️एक वही, एक पेन अभियानाने महामानवाला शैक्षणिक मानवंदना
म्हसवड (सातारा ) : तक्षशिला सामाजिक सेवा संस्था सातारारोड पाडळी आयोजित दि.6 डिसेंबर 2025 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अनोखे असे अभिवादन करण्यात आले हार फुले मेणबत्ती अशा नाशवंत वस्तुंनी बाबासाहेबांना अभिवादन न करता महामानवाला शैक्षणिक मानवंदना देण्यात आली यावेळी संस्थेच्या वतीने एक वही एक पेन अभियान अंतर्गत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला बाबासाहेबांनी बहुजन समाजाला शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा चा संदेश दिला याच संदेशातुन प्रेरणा घेत संस्थेच्या वतीने एकुण 16 गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जमलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा.श्रीकांत आवडे मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षण हा बाबासाहेबांनी दिलेला मुलभूत अधिकार आहे त्यामुळे मिळालेल्या अधिकाराचा उपभोग घ्या असे आवाहन केले कार्यक्रम संयोजक संदिप आवडे (खजिनदार) चेतन आवडे (उपाध्यक्ष) महेश आवडे (जिल्हा संघटक भारतीय कर्मचारी संघ सातारा) पर्णिका आवडे, सायली आवडे,दक्षता आवडे, गौरी आवडे, काजोल आवडे, सारिका आवडे, नालंदा आवडे, स्वाती आवडे,इ उपस्थित होते














