Home महाराष्ट्र चोपडा महाविद्यालयात यशस्वी खेळाडूंचा संस्थेतर्फे सत्कार

चोपडा महाविद्यालयात यशस्वी खेळाडूंचा संस्थेतर्फे सत्कार

151

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.6डिसेंबर):-दि. २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान बारामती जि. पुणे येथे संपन्न झालेल्या  शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथील कनिष्ठ  महाविद्यालयातील कु. किरण किशोर व कु. जिनिशा संदेश क्षीरसागर या यशस्वी खेळाडू विद्यार्थीनींनी राज्यस्तरावर टीम इव्हेंट मध्ये उपविजेतेपद प्राप्त करून सिल्वर मेडल प्राप्त केले.

या यशस्वी खेळाडूंचा संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील व संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.के. एन. सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पी. एस. पाडवी, पर्यवेक्षक ए. एन. बोरसे, रजिस्ट्रार डी. एम. पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here