


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
महाराष्ट्र राज्य सरकारने गोदरी (कुंभ जळगाव) &येथे पार पडलेल्या अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा लमाणा नायकडा समाजाच्या कुंभ मेळाव्यानंतर प्रथमच तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर परभणी जिल्ह्यातील शिवाजीनगर तांडा व दगड वाडी तांडा यास स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मान्यता देत राज्य सरकारने याचे राजपत्र जाहीर केले आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भविष्यात राज्यातील अनेक तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा मार्ग मोकळा होणार असून, बंजारा समाजात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बंजारा समाजाचे धर्मगुरू आ. बाबूसिंग महाराज, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख व आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांचे विशेष योगदान आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल दशरथ प्रभाकर राठोड (संत सेवालाल महाराज बंजारा लमाणा तांडा समृद्धी योजना, जिल्हास्तरीय अशासकीय समिती – परभणी), तसेच विजयराव पवार, विनायक राठोड आणि सरपंच यांनी राज्य शासनाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.














