


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.2नोव्हेंबर):-लोहपुरुष स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या.जयंती निमित्त पोलिस दल व गंगाखेड पोलीस ठाण्याच्या वतीने (दिनांक 30 ऑक्टोबर गुरुवार) रोजी सकाळी ६ वा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे,तहसीलदार उषाकिरण श्रंगारे आदींची उपस्थिती होती.
रन फॉर युनिटी कार्यक्रमास शहरातील सर्वयोग कक्षेचे योग शिक्षक,साधक, रॉयल अँकॅडमीचे संचालक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी पोलिस ठाण्याचे कर्मचारी,लायन्स क्लबचे पदाधिकारी,सामाजिक संस्थांचे सदस्य, शहरातील सुजाण नागरिक आदींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अधिकारी कर्मचारी व सर्व नागरिकांनी सकाळी तीन किलोमीटर धावून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली याप्रसंगी जीवराज डापकर,श्रीकांत डोंगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा उद्देश सांगितला या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पदूदेव जोशी यांनी केले तर आभार योगगुरू प्रकाश डिकळे यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले














