


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.28ऑक्टोबर):-महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानी आत्महत्या केल्याची घटना राज्यात घडली.या घटनेचे त्रिव पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले गंगाखेड येथील डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीनेही त्रिव निषेध नोंदविण्यात आला या प्रकरणाची तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी (दिनांक 27 ऑक्टोबर सोमवार) रोजी गंगाखेड उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अधिक माहिती अशी सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात उच्चशिक्षित महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.संपदा मुंडे कार्यरत होत्या मागील अनेक दिवसापासून त्या कर्तव्यसंबंधी घटनांमुळे मानसिक दडपणाखाली काम करत असल्याने त्यांनी आत्महत्या सारखे कठोर पाऊल उचलले उच्चशिक्षित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यभर या घटनेचे त्रिव पडसाद उमटले गंगाखेड येथेही या घटनेचां त्रिव निषेध व्यक्त करण्यात आला.गंगाखेड डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने त्रिव निषेध नोंदवत या प्रकरणाची तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.हेमंत मुंडे,डॉक्टर सासोसिएशनचे अध्यक्ष डॉ.किशन गारोळे,सचिव डॉ.मनीष बियाणी, भारतीय वैद्यक संघटना अध्यक्ष डॉ.आनंद चांडक,सचिव डॉ.केशव मुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत














