Home मनोरंजन पहेला येथे संगीत चिंगारी नाटक व सत्कार सोहळ्याचे आयोजन 30 ऑक्टोबरला!

पहेला येथे संगीत चिंगारी नाटक व सत्कार सोहळ्याचे आयोजन 30 ऑक्टोबरला!

108

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489

भंडारा(दि.24ऑक्टोबर):-तालुक्यातील मौजा पहेला येथे बाल युवा सांस्कृतिक व क्रीडा मंडळ च्या वतीने दिवाळीच्या शुभ पर्वावर खास नवमीच्या मंडई निमित्त 30 ऑक्टोबर 2025 ला रात्री ९ वाजता रोज गुरुवारला मोफत संगीत चिंगारी नाटक व सत्कार सोहळ्याचे आयोजन श्री हनुमान देवस्थान येथील रंगमंचकावर करण्यात आलेले आहे. वरील नाटकाचे उद्घाटन कविताताई उईके अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा, सहउद्घाटक सुभाष आजबले अध्यक्ष सहकारी पतसंस्था वाकेश्वर, कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद नखाते अध्यक्ष हनुमान देवस्थान कमिटी, दीप प्रज्वलन काजल चवळे पंचायत समिती सदस्या ,दीपक वानखेडे उद्योजक राईस मिल पागोरा, ओमप्रकाश नकाते, देवानंद वैरागडे ,यांचे उपस्थितीत होईल.

मार्गदर्शक म्हणून मंगलाताई ठवकर सरपंच,विजय भुरले माजी मुख्याध्यापक , तर विशेष अतिथी म्हणून सुशील बांडेबुचे उपसरपंच, विकास भुरले तंटामुक्ती समिती अध्यक्ष, सखाराम चवळे अध्यक्ष विविध कार्यकारी सहकारी संस्था, चंद्रशेखर खराबे पोलीस पाटील, संजीव भांबोरे राज्य सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, यामिनी बांडेबुचे माजी जि. प. सदस्या , व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होईल. करिता या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश बोंद्रे, उपाध्यक्ष सुशील बांडेबुचे, सचिव रामेश्वर खराबे, सहसचिव श्रीकृष्ण कहालकर, कोषाध्यक्ष गुलाब चवळे यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here