Home महाराष्ट्र मांदुर्णे गावात महात्मा बळीराजा यांना अभिवादन !

मांदुर्णे गावात महात्मा बळीराजा यांना अभिवादन !

116

▪️परिवारातील सदस्यांना “राजेंद्र कुंभार लिखित दिवाळीच्या खरा इतिहास ” ग्रंथ भेट !….

✒️चाळीसगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चाळीसगांव(दि.23ऑक्टोबर):-चाळीसगाव तालुक्यातील मांदुर्णे या गावात शेतकरी कुटुंबात धर्मराज पुंडलिक पाटील यांच्या घरी गेल्या पाच वर्षापासून शेतकरी पुत्र, जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी राजा – महात्मा बळीराजा यांचे पूजन आदर्श शेतकरी धर्मराज पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आले.

       याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी लोककल्याणकारी – महात्मा बळीराजा यांचे जीवन कार्य उलगडले. वाचन संस्कृती वाढावी व खरा इतिहास परिवारासमोर यावा म्हणून याप्रसंगी परिवारातील सर्व सदस्यांना लेखक राजेंद्र कुंभार लिखित “दिवाळीचा खरा इतिहास ” हा अनमोल ग्रंथ भेट देण्यात आला.

        याप्रसंगी आदर्श शेतकरी धर्मराज पाटील, दगडू पाटील, कैलास पाटील, निलेश पाटील, प्रा.पंकज पाटील, सचिन महाजन, घनश्याम माळी, हिमांशू माळी, सुंदरबाई पाटील, शोभा महाजन, पल्लवी पाटील, सारीका महाजन,पद्मिनी माळी, हेमांगी पाटील यासह संत सावता महाराज चौक येथील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here