


✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)
खटाव(दि.10ऑक्टोबर):-बोगस दस्तऐवज करून फसवणूक केल्याप्रकरणी टी . एस. विंड पॉवर डेव्हलपर्स या पवनचक्की कंपनीचे भागीदार जयंत गोविंद ठक्कर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे वरुड ता. खटाव येथील पिडीत शेतकरी जगन्नाथ उत्तम जाधव यांनीऔंधपोलीसांकडे केली आहे.
याबाबत लेखी निवेदनात दिलेली अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील वरुड ता. खटाव येथील जगन्नाथ उत्तम जाधव यांच्या आई कल्पना उत्तम जाधव यांनी वरुड हद्दीतील गट क्रमांक 806व 767/1या गटातील क्षेत्राचे कुलमुखत्यार विना मोबदला 27नोव्हेंबर 2007रोजी टी.एस.विंड डेव्हलपर्स तर्फे भागीदार जयंत गोविंद ठक्कर यांनी केले होते.
मात्र त्यानंतर आपल्या आई कल्पना यांचा 5 ऑगस्ट 2021 रोजी मृत्यू झाला.
त्यानंतर आम्ही वारस असूनही आमची परवानगी न घेता तसेच आई जिवंत असल्याचेऱ्य स्वयं घोषणापत्र देऊन 27नोव्हेंबर 2007च्या आधारे सातारा दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी केली आहे.
यामुळे आमच्या कुटुंबावर अन्याय झाला असून संबंधित कंपनी टी.एस.विंड पॉवर डेव्हलपर्स व जयंत गोविंद ठक्कर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी जगन्नाथ जाधव यांनी केली आहे.
▪️चौकट. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या
पवनचक्की कंपन्यांच्या बोगस कारभाराच्या चौकशीसाठी महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील
महा ऊर्जा विभागाकडे तसेच संबंधित केंद्रीय मंत्री,राज्य शासनाशी संपर्क साधून पत्र व्यवहार करणार आहे अशी माहिती गणेश चव्हाण यांनी दिली.
खटाव तालुक्यातील पवनचक्की व्यवहारात मोठया प्रमाणात गैर व्यवहार झाले असून अनेक ठिकाणी चुकीच्या नोंदी उघडकीस आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत . याबाबत सातारा व वडूज दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.














