


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.9ऑक्टोबर):-नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची २५९ वी पुण्यतिथी दिनांक ०८आक्टोबंर२०२५ रोज बुधवार ला श्री संत नगाजी महाराज देवस्थान कहाली खंडाळा रोड ब्रम्हपुरी उस्ताहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रसंगी नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ब्रम्हपुरी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा व रक्तदान शिबिरापासुन करण्यात आली त्यामध्ये डॉ. प्रितम खंडाळे वैद्यकीय अधिकारी ब्रम्हपुरी, लीना ठाकरे परिसेविका, दीक्षा वानखेडे प्रयोगशाळा उज्वला मेश्राम प्रयोगशाळा, प्रिया आखाडे आरोग्य सेविका यांनीमदतीचे सहकार्य केले,तर संपूर्ण शहरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील समाजबांधवांनी संपूर्ण सलुनचे दुकान बंद ठेवली.त्यानंतर स्वरांजली भजन मंडळ सुरबोडी तर्फे नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजनाच व सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
त्यानंतर पुण्यतिथी कार्यक्रमला सुरवात झाली , कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी चे मुख्य मार्गदर्शक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर यांनी केले.तर कार्यक्रमाची प्रास्ताविक ना.युवा आघाडी ब्रम्हपुरी चे अध्यक्ष लक्ष्मीकांत दिवाकरजी फुलबांधे यांनी केले ,तर आभारप्रदर्शन नाभिक युवा महिला आघाडी च्या अध्यक्षा रजनी ताई सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. माणिक मेश्राम , तर प्रमुख म्हणून मा. संजय पगाडे, होमराज पगाडे, रवींद्र नक्षीने, विजय शिवणकर, कल्पना गेडाम, योगेश फुलबांधे, संदीप लांजेवार, प्रदीप मेश्राम मोहन लांजेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावी मध्ये कुमार. हर्षल होमराज पगाडे रा. गंगालवाडी याने ९४.२०% गुण मिळवून ने हि विद्यालय ब्रम्हपुरी तथा नाभिक समाजामधुन तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मिळवला, कुमार कुणाल प्रदीप सूर्यवंशी रा.ब्रम्हपुरी ८९.९०%गुण मिळवून तालुक्यातील द्वितीय क्रमांक पटकावला, तर कुमारी रिया गणेश मेंढुलकर रा.ब्रम्हपुरी ७९%गुण मिळवून तालुक्यातील तिसरा क्रमांक पटकावला,तर इयत्ता बारावीमध्ये कुमारी. भूमेश्वरी वैभव फूलबांधे ने प्रथम क्रमांक पटकावला व इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचा पाहुण्यांनी करुन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी ,सलुन असोसिएशन ब्रम्हपुरी, नाभिक युवा महिला आघाडी ब्रम्हपुरी, ब्रम्हपुरी नाभिक युवा आघाडी ग्रामीण च्या सर्व पदाधिकारी व सदस्य गण यांनी अथक परिश्रम केले.














