Home महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक बिंदू माधव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी

ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक बिंदू माधव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी

165

प्रतिनिधी(अनिल साळवे, 8698566515)
गंगाखेड येथे ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक, ग्राहक तीर्थ व स्वातंत्र्यसैनिक बिंदू माधव जोशी यांची जयंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य गंगाखेड शाखेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्राहकांच्या हक्कांची जाणीव निर्माण व्हावी तसेच समाजात जागरूकता वाढावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव चव्हाण, जिल्हा संघटक अॅड. उत्तम काळे, गंगाखेड तालुका अध्यक्ष प्रभू राठोड, सचिव संतोष कलिंदर, उपाध्यक्ष राजू लांडगे, पालम तालुका अध्यक्ष सुदाम लोंढे, माऊली मवाळे, तसेच प्रमोद कवडकर, गणेश आवके, बाबुराव कंधारे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व पदाधिकारी आणि ग्राहक नागरिकांनी बिंदू माधव जोशी यांना अभिवादन करून त्यांचे स्मरण केले. अभिवादनाचा क्षण छायाचित्रात टिपण्यात आला असून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here