Home विदर्भ फुले ,शाहू ,चारिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशन यूनियन महाराष्ट्र अध्यक्षपदी डी जी...

फुले ,शाहू ,चारिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशन यूनियन महाराष्ट्र अध्यक्षपदी डी जी रंगारी यांची नियुक्ती

202

संजीव भांबोरे
भंडारा–फुले शाहू चॅरिटेबल ट्रस्ट व वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या एनजीओ ठाणे ( मुंबई)
या सामाजिक संस्थेच्या टीचर युनियन महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षक डी जी रंगारी यांची निवड करण्यात आली .डी जी रंगारी शिक्षक पदावर 33 वर्षे कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा म्हणून संघटनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच ते पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांच्या फार मोठा योगदान आहे .त्यांच्या त्या क्षेत्रात मोठं काम आहे .विविध क्षेत्रात विविध पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत .महाराष्ट्र शासनातर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे . त्यांच्या निवडीबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वंचित बहुजन आघाडी ,महामाया महिला सामाजिक न्याय संघटना, साकोली सेंदुरवाफा बेरोजगा निवासी संघटना, महाराष्ट्र पत्रकार संघ , गुड मॉर्निंग ग्रुप व सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारींनी तसेच फुले ,शाहू पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here