Home चंद्रपूर राजेंद्र मोहितकर यांची शिक्षक परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

राजेंद्र मोहितकर यांची शिक्षक परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड

148

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179

चिमूर- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण व शहर कार्यकारिणी तसेच सर्व तालुक्याचे पदाधिकारी यांची सभा लोकमान्य कन्या विद्यालय चंद्रपूर येथे नुकतीच संपन्न झाली
सभेच्या अध्यक्षपदी नागपूर विभागाचे उपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार हे होते तर प्रमुख अतिथी संघटनमंत्री रामदास गिरडकर जिल्हा अध्यक्ष विलास खोंड ,कार्यवाह विठ्ठल राजुरकर हे होते. या सभेत चंद्रपूर जिल्हा ग्रामीण विभागाची एकुण १८ लोकांची कार्यकारिणी निवडण्यात आली.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून चिमूर येथील न्यू राष्ट्रीय विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक राजेंद्र मोहितकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते गेल्या ३५ वर्षांपासून शिक्षक परिषदेचे कार्य करित आहेत. त्यांनी शिक्षक परिषदेत नगर, तालुका व जिल्हा कार्यकारिणीत आजपर्यंत विविध पदे भूषविली आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व कार्यकर्त्यांनी स्वागत करून त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here