Home महाराष्ट्र गुड शेपर्ड स्कुलचे व्हाँलीबाँल स्पर्धेत यश

गुड शेपर्ड स्कुलचे व्हाँलीबाँल स्पर्धेत यश

128

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलच्या १७ वर्ष आतील गटातील खेळाडूंनी अंतिम सामन्यात पाचोरा विद्यालयाच्या संघाला पराभूत करून जिल्हास्तरावर विजय संपादन केला व विभागीय स्तरावर धडक मारली.
सविस्तर माहिती अशी की, शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा १७ वर्ष आतील वयोगटातील व्हाँलीबाँल सामने विद्या इंग्लिश मिडीयम स्कुल जळगाव येथे नुकतेच संपन्न झाले. यात गुड शेपर्ड स्कुलच्या अंडर १७ मुलांच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर मजल मारली. पाचोरा विद्यालयाचा पराभव करून या संघाने जिल्हास्तरावर विजय मिळवला. यामध्ये कर्णधार मेहुल कोठारी, मनिष पाटील, भावेश पवार, जयकुमार चौधरी, कुणाल पाटील, आयुष जनकवार, विवेक पाटील,दक्ष महाजन, प्रिन्स बारेला,जिगनेश बयस,दर्शन महाजन, क़िष्णा पवार या सर्व विजयी खेळाडूंचे प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका भारती तिवारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सर्व शिक्षकवर्ग आणि मॅनेजमेंट यांनी संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघाला क्रीडा शिक्षक ललित ढोके यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here