Home चंद्रपूर दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साधन साहित्य वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साधन साहित्य वितरण

243

 

ब्रह्मपुरी – समग्र शिक्षा जिल्हा परिषद चंद्रपूर पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत दिनांक 09 सप्टेंबर 2025 ला गटसाधन केंद्र पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साधन साहित्य वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला शिफारस पत्र 10 दिव्यांग विद्यार्थी व पालक उपस्थित राहून यांना माननीय गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे, शेळके मॅडम विस्तार अधिकारी शिक्षण, तोराम मॅडम विस्ताराधिकारी शिक्षण, विशेष शिक्षक, गटसाधन केंद्र कर्मचारी या सर्वांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या पालकांना साधन साहित्य वितरित करण्यात आले. माननीय गटशिक्षणाधिकारी खुणे साहेब यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना दिव्यांगाच्या विविध क्षेत्रातील अनुभव गोष्टी व त्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोन यावर पालकांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here