Home चंद्रपूर ग्रामगीता महाविद्यालयात “अ‍ॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC)” विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

ग्रामगीता महाविद्यालयात “अ‍ॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC)” विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

170

 

चिमूर : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) च्या सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने “अ‍ॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC)” या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय क्षमता निर्माण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यशाळेसाठी डॉ. होमराज पटेलपैक लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी व डॉ. प्रशांत वाघ आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुनंदा एस. आस्वले होत्या. यावेळी आयक्यूएसी समन्वयक डॉ. निलेश ठवकर व PM-USHA सह-समन्वयक प्रा. विवेक माणिक मंचावर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. होमराज पटेलपैक यांनी विद्यार्थ्यांना “अ‍ॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स” या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती दिली. क्रेडिटचा वापर, क्रेडिट रिडिम करण्याची प्रक्रिया व त्याचे शैक्षणिक महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर डॉ. प्रशांत वाघ यांनी सामुदायिक सहभाग व फील्ड प्रोजेक्टच्या माध्यमातून सामाजिक जाणिवा कशा विकसित करता येतील याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना, तृतीय व चतुर्थ सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत “अ‍ॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स” विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त ठरू शकते हे अधोरेखित केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. विवेक माणिक यांनी केले. संचालन प्रा. डॉ. वरदा खटी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. निलेश ठवकर यांनी मानले.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता डॉ. प्रशांत ठाकरे समन्वयक PM-USHA, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यशाळेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here