


कोल्हापूर (प्रतिनिधी) : विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि मानवतावादी भूमिका घेऊन सर्वसामान्य बहुजनवादी वंचित महिलांसाठी कृतीशील कार्य करणाऱ्या आम्ही भारतीय महिला मंचच्या राज्याध्यक्षपदी कोल्हापूर येथील ॲड. करुणा विमल यांची मुंबई येथे पार पडलेल्या मेळाव्यात सर्वानुमते निवड करण्यात आली.
ॲड. करुणा विमल वीस वर्षाहून अधिक विविध सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहेत. त्या सध्या जिल्हा व सत्र न्यायालय,
कोल्हापूर येथे विधीज्ञ तसेच धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा, निर्मिती लिगल असोसिएशनच्या खजिनदार म्हणून कार्यरत आहेत.
सामाजिक चळवळींच्या अभ्यासक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. यापूर्वी मानवी हिताच्या अनेक समुपदेशन केंद्रावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. अनेक महत्वपूर्ण ग्रंथाचे त्यांनी संपादक केले असून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 40 हून अधिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
सदर मेळाव्याला विजया कांबळे, विमल पोखरणीकर, अनिता गायकवाड, नीती उराडे, डॉ. निकिता चांडक, लता पुजारी, ॲड. सुनिता भिंगारदेवे, भारती पाटील, प्रियांका पाटील, प्रिती गायकवाड, प्रियांका डावरे, प्रज्ञा कांबळे, कमल ठाणेकर, वंदना दीक्षित, नुतन गोंधळी, सुजाता कांबळे, सविता हुपरीकर, वेदा सोनुले, धनश्री नाझरे, यास्मिन मकानदार, ॲड. तमन्ना मुल्ला, आशा केसरकर, छाया माने, वृषाली कवठेकर, डॉ. सुजाता नामे, पुनम मेधावी यांच्यासह राज्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.













