


झाडाच्या पानाआड लपले घर,
पक्षी आले चोचीत चारा घेऊन.
पिलांना भरवते प्रेम,
किती छान आहे त्यांचे जीवन ॥
अश्या ओळी हे पक्षाचे घरटे बघून म्हणावश्या वाटतात. राजुरा येथील पर्यावरणप्रेमी, माजी उप नगराध्यक्ष सुनील देशपांडे आणि त्यांच्या पत्नीने घराच्या अंगणात अनेक फुलझाडे लावून पर्यावरणपूरक वातावरण तयार केल्याने अनेकदा पक्षी या ठिकाणी वेगवेगळी लक्षवेधी घरटी तयार करून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. पक्षाने चोचीने विणकाम करून आपले सुरक्षित घरटे तयार केले.
छाया:- सौ.सुवर्णा बादल बेले, राजुरा














