


. प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515) गंगाखेड येथे तथागत नगरात केस माझी जेव्हा गळू लागले! तेव्हा जीवन मला हे कळू लागले! या सुरात महाकावी वामनदादा कर्डक यांची 103वी जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रत्यक्ष भेटी दरम्यान वाहवा मिळवत वामनदादा करडकांनी पाठीवर प्रेरणेची थाप मारून घेत असताना फुले,आंबेडकर विचारांची शिदोरी घेऊन अविरतपणे वाडी/तांडा,गावागावात,शहरा शहरांमध्ये बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकरांचे विचार,शिक्षित पिढी घडवण्याचे मोलाचे कार्य महाकवी वामनदादा कर्डक यांनी भारताला स्वतंत्र मिळाल्या नंतरआपल्या गीताच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळेच 15 ऑगस्ट रोजी लोककवी वामनदादा कर्डक यांचे 103 व्या जयंती औचित्य साधून वामनदादा कर्डक यांच्या चाहत्यांनी मनोगत व्यक्त करताना वामनदादा करडकांची गीत रचना सादर केली. .
या प्रसंगी तथागत भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महामानव वामनदादा कर्डक यांच्या प्रतीमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संकल्प भुमी बुद्ध विहार,तथागत नगर गंगाखेड या ठिकाणी वामनदादांच्या गीतावर प्रेम करणारा च्याहता वर्ग धम्म उपासक भिमाचे शिलेदार यांनी साजरी केली.याप्रसंगी महाकवी वामनदादा कर्डक यांचे शिष्य/ चाहते मान्यवरांनी मनोगत व्यक्ती केले.त्या मध्ये ॲड.राजु गरुड,मुंजाजी कांबळे,रावसाहेब मस्के,प्रा.भगवान गायकवाड यांनी मनोगत आणि गीतातून विनम्र अभिवादन व्यक्त केले. महाकवी वामनदादा कर्डक अभिवादन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहूल गायकवाड, महादेव व्हावळे, विलास जाधव, संदेश कांबळे सर, मेघानंद गोदाम, नितीन सोनकांबळे सर, उमाकांत हेंडगे,मधूकर जोंधळे, नैतिक व्हावळे यांची उपस्थिती होती. छोट्याशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य लक्ष्मण व्हावळे यांनी केले तर आभार पत्रकार राहुल साबणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.













