


म्हसवड (सातारा ) : म्हसवड पोलीस ठाणे हददीतुन चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल महाराष्ट्र तसेच कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडु, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातुन शोध घेवून एकुण ६१ मोबाईल १६ लाख रूपये किंमतीचे तक्रारदार यांना श्री. अक्षय सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी म्हसवड पोलीस ठाणे यांचे हस्ते आज रोजी स्वातंत्र्यदिना निमीत्ताने परत केले .
मा. तुषार दोशी सो पोलीस अधिक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर सो अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा. अश्विनी शेंडगे सो उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडुज, मा. अक्षय सोनवणे सो प्रभारी अधिकरी म्हसवड पोलीस ठाणे यांनी म्हसवड पोलीस ठाणे हददीतुन चोरीस गेलेले, हरविलेले मोबाईलचा शोध घेणेकामी विशेष पथक स्थापन करून जास्तीत जास्त हरविलेले मोबाईलचा शोध घेवून ते नागरीकांना परत करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने श्री. अक्षय सोनवणे यांनी नागरीकांचे हरवलेले मोबाईल शोध घेणेकामी म्हसवड पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अमंलदार यांचे पथक तयार करून त्यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफ ने CEIR पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेल्या मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करून तात्काळ कारवाई करीता महाराष्ट्र तसेच इतर विविध राज्यातुन चिकाटीने सदरची मोहिम राबवुन नागरीकांचे गहाळ व चोरी झालेले एकुण ६१ मोबाईल परत मिळवुन तक्रारदार यांना श्री. अक्षय सोनवणे सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी म्हसवड पोलीस ठाणे यांचे हस्ते आज रोजी स्वातंत्र्यदिना निमीत्ताने परत केले.
म्हसवड पोलीस ठाणे हददीत म्हसवड शहर हे मुख्यठिकाण असुन तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने तसेच आसपासचे गावातुन शासकीय कार्यालयात, विदयालये तसेच महाविदयालये तसेच श्री. सिध्दनाथ मंदीर हे धार्मिक स्थळ असुन अकलुज ते कराड, पुणे ते आटपाडी, पंढरपुर ते सातारा रस्त्यावरील मुख्य मार्गावरील म्हसवड शहरात बस स्थानक असल्याने म्हसवड येथे आजुबाजुचे गावातून
हजारोचे संख्येने लोक नोकरी, रोजगार, शिक्षण, बाजारपेठेमध्ये खरेदी व इतर करण्यासाठी म्हसवड शहरात येत जात असतात त्यावेळी प्रवासात, बाजार पेठेत व इतर ठिकाणी नागरीकांचे मोबाईल फोन हे गहाळ तसेच चोरी होत असतात. सदर गहाळ मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तसेच CEIR पोर्टलचे मदतीने म्हसवड पोलीस ठाणे येथे श्री अक्षय सोनवणे यांनी नेमलेले विशेष पथकाने महाराष्ट्र राज्याचे विविध भागातुन तसेच राज्यातुन मोबाईल परत मिळवत गहाळ झालेले मोबाईल तक्रारदार यांना परत केल्याने नागरीकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत प्रशंसनीय भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सन २०२५ मध्ये विविध नामांकिंत कंपनीचे एकुण ७८ मोबाईल २१ लाख रूपये किंमतीचे म्हसवड पोलीस ठाणेचे विशेष पथकाने आज पर्यंत तक्रारदार यांना परत केले आहेत. नागरीकांना त्यांचे चोरीस गेलेले व हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने त्यांचे चेह-यावर हसु उमटले व या उपक्रमाचे नागरीकांनी विशेष कौतुक केले आहे.
सदर कारवाई ही मा. तुषार दोशी सो पोलीस अधिक्ष सातारा, मा. वैशाली कडुकर सो अप्पर पोलीस अधिक्षक सातारा, मा. अश्विनी शेंडगे सो उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी कॅम्प वडुज, यांचा मार्गदर्शनाखाली मा. अक्षय सोनवणे सो प्रभारी अधिकरी म्हसवड पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, पो. कॉ. विनोद सपकाळ, पो. कॉ. अभिजीत भादुले, पो.कॉ. वसीम मुलाणी, पो. कॉ. नवनाथ शिरकुळे, पो.कॉ. अनिल वाघमोडे, म. पो. कॉ. पुनम जाधव तसेच सातारा सायबर पोलीस ठाणेचे पो.कॉ. महेश पवार यांनी केलेली असुन सातारा जिल्हयातील वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी म्हसवड पोलीस ठाणेच्या विशेष पथकाचे अभिनंदन केले आहे.














