Home चंद्रपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथे रक्तगट व सिकलसेल तपासणी शिबिर उत्साहात...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथे रक्तगट व सिकलसेल तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

156

 

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

नागभीड : नागभीड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथे स्मृतीशेष तिकवडू पांडुरंग वाकडे यांच्या स्मृतीपित्यर्थ ग्रामीण रुग्णालय नागभीड अंतर्गत अंगणवाडी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचे रक्तगट व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती, बाम्हणी तर्फे करण्यात आले. या शिबिरात जवळजवळ 90 विद्यार्थ्यांची रक्तगट व सिकलसेल तपासणी करण्यात आली.
या शिबिराच्या उद्घाटनसोहळ्याला उद्घाटक म्हणून गोपाळाजी खोब्रागडे, प्रतिष्ठित ग्रामस्थ, कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विराग वाकडे यांनी भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून प्रतिभा भोगेकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (सिकलसेल), ग्रामीण रुग्णालय नागभिड, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आशिष भोयर, रसिकाताई चौधरी, राजकुमार गजभे, भाविक ठवरे, विनायक गजबे, गुरुदेव नारनवरे, भीमानंद दुधे, विजय बागडे, प्रमोद पाल यांची उपस्थिती होती.
रक्तगट व सिकलसेल तपासणी शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून व मानवंदना देऊन करण्यात आले. विराग वाकडे यांनी स्मृतीशेष तिकवडू वाकडे यांच्या स्मृतींना उजाळा देत अतिशय गरीब परिस्थितीमध्ये “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा”, “तुम्ही स्वतः उपाशी रहा; मात्र आपल्या मुलांना शिकवा” हा बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र तंतोतंत कशा पद्धतीने पाळला याचे उदाहरण दिले. व शिक्षण हेच सर्व मानवी विकासाचे सार आहे, हे पटवून दिले.
या शिबिरामध्ये 90 विद्यार्थ्यांचे रक्तगट व सिकलसेल तपासणी करण्यात आली. सिकलसेल तपासणी मधून पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांशी संवाद साधून पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे रेफर करण्यात आले. रक्तगट व सिकलसेल तपासणी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका भेंडे यांनी केले व अंगणवाडी मदतनीस भाग्यश्री गजभे यांनी उपस्तितांचे आभार मानले. या शिबिराच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या मदतनीस पुष्पा सूर्यवंशी, कुमुदिनी वाकडे, रिया गजभे आणि तथास्तु वाकडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here