


प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
गंगाखेड येथील सर्व पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने संभाजी ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर आक्कलकोट येथे सार्वजनिक कार्यक्रमात जिवघेण्या हल्या करण्यात आला. प्रविण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या निषेध करत आहेत. प्रविण दादा गायकवाड यांचे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीत उल्लेखनीय कार्य केले आहे. संविधान, समता, बंधुता, स्वातंत्र व सामाजिक एकता, सामाजिक सलोखा राखण्यासाठी व समाजात राज्यघटनेला अभिप्रेत असनारा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काम करणाऱ्या समाज सेवकांना कट्टर पंथीय, धर्मांध जातियवादी संघटणा कडून सातत्याने हल्ले केले जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम या संघटणाकडून केले जात आहे. सरकार अशा धर्मांध संघटणांना पाठीशी घालत आहे का हा प्रश्न महाराष्ट्रच्या जनतेच्या मनामध्ये निर्णय झाला आहे. राज्यातील कारदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात सरकार अपयशी ठरल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे. या प्रकरणी सरकार निष्पक्षपाती कारवाई करावी अशी माफक अपेक्षा सामाजिक संघटणाकडून केली जात आहे. त्याच बरोबर गुन्हातील आरोपी वर कठोर कारवाई करावी. प्रविण दादा गायकवाड यांच्यावर जिवघेणा हल्याचा कट रचणाऱ्या मुख्य सुत्रधारांचा शोध घेऊन प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ता सेक्रेटरी कॉ.ओंकार पवार, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ.शिवाजी कदम,कॉ.योगेश फड,कॉंग्रेस मागासवर्ग आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते भाई गोपीनाथ भोसले, संभाजी ब्रिगेडचे ता अध्यक्ष सुनील पौळ, महाराष्ट्र जनक्रांती सेनेचे रोहीदास लांडगे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मोतीराम चौरे,शामसुंदर जाधव, आल्पंसंख्यांक सेलचे अजहर शेख, ए आय एम आय एम चे शहर अध्यक्ष वहाज खान, वंचित आघाडीचे संघरत्न गायकवाड, चर्वाक दर्शन मंच चे संदिप जाधव, सुरेश इखे, लक्ष्मण कचरे, आत्माराम मुठाळ, अरुण गिराम, कृष्णा गायकवाड, सुरेश उबाळे,दत्तराव जाधव अदि उपस्थित होते.














