Home चंद्रपूर रा. म. गांधी महाविद्यालयात एच. पी. सी. एल. छात्रवृत्ती वितरण समारोह

रा. म. गांधी महाविद्यालयात एच. पी. सी. एल. छात्रवृत्ती वितरण समारोह

168

 

संजय बागडे, नागभीड प्रतिनिधी, मो. 91689 86378

नागभीड – राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड पश्चिम क्षेत्र सी.एस.आर. निधी अंतर्गत छात्रवृत्ती वितरण समारोह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एच पी सी एल चे मुख्य प्रबंधक अमित डी. भसारकर, मानव संसाधन क्षेत्रीय कार्यालय, नागपूर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एच पी सी एल च्या मानव संसाधन अधिकारी सरोज मेश्राम होत्या व कु. संस्कृती ढोबे यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रमुख मार्गदर्शक अमित भसारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना क्षेत्र कुठलेही असले तरी आयुष्यात परिश्रमाला पर्याय नाही आणि परिश्रम जर प्रामाणिक असले तर यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असे सांगून जी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली त्याचा सदुपयोग कौशल्यपूर्ण शिक्षण प्राप्त करून जिवन सार्थकी करण्यात करावा. असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी मोठे स्वप्न असेच पूर्ण होत नाही त्यासाठी प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्ती असावी लागते. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड ची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्राप्त झाली त्या विद्यार्थ्यांना अमित भसारकर व उपस्थित मान्यवरांच्या यांचे हस्ते शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांचे हस्ते अमित भसारकर, सरोज मेश्राम व कु. संस्कृती ढोबे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. विकास मोहतुरे यांनी केले तर आभार प्रा. निलेश गोडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील समस्त प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here