Home महाराष्ट्र नवीन तुकडा बंदी कायद्यामुळे नियम झाले शिथिल

नवीन तुकडा बंदी कायद्यामुळे नियम झाले शिथिल

258

 

 

नागेश खुपसे-पाटील
( सोलापूर जिल्हा प्रतिनिधी)

सोलापूर -महाराष्ट्रातील जमीन मालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्याच्या महसूल विभागाने तुकडा बंदी कायद्यात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील 5 लाखांहून अधिक कुटुंबांना मोठा फायदा मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच ही माहिती दिली असून, यामुळे अनेकांचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.
नवीन बदलांनुसार, तालुका क्षेत्रातील जिथे जिथे रहिवासी क्षेत्र (residential area) म्हणून विकसित झाले आहे, त्या सर्व ठिकाणी तुकडा बंदी कायदा रद्द केला जाईल. याचा अर्थ, ज्या जमिनींवर लोक वस्ती करून राहात आहेत किंवा ज्यांना निवासी वापरासाठी अधिकृत मान्यता मिळाली आहे, अशा ठिकाणी आता जमिनीचे छोटे तुकडे खरेदी-विक्री करण्यास कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here