Home यवतमाळ गांजाची विक्री करणाऱ्या इसमाकडुन 2 किलो 313 ग्रॅम गांजा जप्त-डिटेक्शन ब्रँच (DB)...

गांजाची विक्री करणाऱ्या इसमाकडुन 2 किलो 313 ग्रॅम गांजा जप्त-डिटेक्शन ब्रँच (DB) यांची कारवाई

147

 

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (विशेष प्रतिनिधी)

 

उमरखेड -पोलीस अधिक्षक याच्या अवैध धंदे कारवाई करणे संबंधाने दिलेल्या निर्देशानुसार उपविभागीय पोनि शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात दि. 09 जुलै 2025 रोजी पोउपनि योगेश जाधव यांना माहीती मिळाली की, उमरखेड महागाव महामार्ग रोडवर असलेल्या राजस्थान धाब्याजवळ एक इसम ज्याने अंगात काळया रंगाचा शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केलेला आहे. असा इसम गांज्याची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या गांजा अंमलीपदार्थ घेउन रस्त्याने येत आहे. अशा गोपनिय माहिती मिळाल्यावरुन पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ पो स्टे उमरखेड, पोउपनि योगेश जाधव, पोउपनि सागर इंगळे, पोहेका/2020 पोशि/879 नोळे, 1191 महाळनर, पोशि/137 दरबस्तेवार, चालक पोकॉ/ 2632 रुद्र तसेच वजनकाटे वाले, फोटोग्राफर, दोन सरकारी पंच असे रवाना होवुन सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे गजानन अशोक डहाळे, वय- 25 वर्ष, रा. गोचरस्वामी वार्ड, सोनार लाईन, उमरखेड जि. यवतमाळ यांचे ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची नायलॉनची पोतडी ज्याच्यावर राष्ट्रीय उत्पादक्ता पुरस्कार विभुषीत असे लाल अक्षरात लिहलेले, ज्यामध्ये हिरवट काळपट गांजा अंमली पदार्थ ज्याचे निव्वळ वजन 2313 ग्रॅम किमंत अं 20,000/-रुपये प्रति किलो प्रमाणे असा एकुण 46000/- रुपये किंमतीचा गांजा अंमली पदार्थ माल मिळुन आला. व एक पांढऱ्या रंगाची नायलॉनची पोतडी ज्याच्यावर राष्ट्रीय उत्पादक्ता पुरस्कार विभुषीत असे लाल अक्षरात लिहलेले पोतडीचे खाली वजन 115 ग्रॅम किंमत अं.00/- रुपये एकुन वजन 2428 ग्रॅम असा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे पो स्टे उमरखेड येथे गुन्हा नोंद करणे चालु आहे.

सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर अधिक्षक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड पोउपनि योगेश जाधव डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पोउपनि सागर इंगळे, पोहेका/2020 संदिप टाकुर, पोहका / दिनेश चव्हाण, पोशि/879 नोळे, पोशि/1191 महाळनर, पोशि/137 दरवस्तंवार, चालक पोकॉ/ 2632 रुद्र यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here