


पुसद प्रतिनिधी
वंदनीय गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कुलदैवत पंढरीचा पांडुरंग होय त्यामूळे बालपणापासूनच त्यांना विठ्ठल भक्तीची ओढ होती व अत्यवस्थ अवस्थेत सोडून त्यांनी पंढरपूर ची वारी आयुष्यभर केली दरवर्षी लाखो वारकऱ्यांना आपल्या भजनांनी मंत्रमुग्ध केले अंतिम भजन पंढरपूरला गाऊन खंजिरी ठेवली ती पुन्हा हाती घेतली नाही सर्व गुरुदेव भक्तांनी दर्शनासह महाराजांचे साहित्य व आयुर्वेदिक औषधी घ्याव्या असे प्रतिपादन मुख्य आयोजक व व्यवस्थापक सुशील महाराज वणवे यांनी केले.
दरवर्षी गुरूकुंज मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुकासह गावोगावी त्यांच्या विचारांचा प्रचार,प्रसार, ध्यान, सामुदायिक प्रार्थना,भजन, भाषण,प्रवचन, किर्तन करत पंढरपूर येथे जात असते. पुसद नगरीत त्यांची व्यवस्था मधुकर आजमीरे व प्राचार्य डॉ.संजय गुमळे यांच्या कडे असते. यावर्षी सुद्धा मधुकर आजमिरे, डॉ. संजय गुमळे, प्रा. प्रकाश लामने यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या व शेकडो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत चरण पादुका दर्शन सोहळा पार पडला.
यावेळी सुशील महाराज वणवे सह पुजारी एकनाथ महाराज गावत्रे, राजेंद्र महाराज कठाडे, जिवन महाराज मेटकर, कृष्णा बोराडे, गणेश जवंजाळ, प्रमोद देशमुख, गणेश घाटोळ, सुधाकर जाधव, अमोल बारंगे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व प्रा. नंदकुमार खैरे लिखित पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चरण पादुका पालखी सोबत आलेल्या गुरुदेव प्रेमिंनी रसाळ भजने सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्रा. शरद राऊत यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका पुसद नगरीत येणे अहोभाग्य असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रिय किर्तनकार भिमराव महाराज,डॉ.राजेंद्र जाजू, प्राचार्य रविंद्र महल्ले, भैय्यासाहेब पद्मावार, विनय व्यवहारे, नंदकुमार पंडित, ज्ञानेश्वर ताकतोडे,माजी केंद्रप्रमुख निवृत्तीनाथ बैस्कार, ग्रामगीताचार्य किसन गरडे, शिवशंकर नागरे,यशवंत देशमुख, ज्ञानेश्वर इंगोले, बाबासाहेब वाघमारे, मनोहर बनस्कर, सुरेश कदम, अशोक भगत महाराज, शिवलिंग पटवे, रमेश सरागे, पुंडलीक भालेराव, यशवंत भगत, अनिल अस्वार, श्यामराव देशमाने, ग्रामगीताचार्य नारायण कवठकर, हातमोडे महाराजांसह असंख्य पुरूष व महिला प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सेवाधिकारी गणेश धर्माळे यांनी तर आभारप्रदर्शन गुरुदेव सेवा मंडळ शाखा पुसद अध्यक्ष प्रा. प्रकाश लामने यांनी मानले.














