


आज २४/५/२०२५ नाशिक येथे भुमिअभिलेख ची मिटींग आहे
तर जामनेर तालुक्यातील माळ पिंपरी येथील शेतकरी सुरेश पंडित शिंगोटे, संजय पंडित शिंगोटे यांची जमीन गट नंबर १०७ मोजणीसाठी पैसे भरले. अडीच वर्षे झालीत.अर्ज केला.कर्मचारी अजून मोजणी करून देत नाहीत.
जर हे काम भारतीय भुमि अभिलेख अधिकारी करु शकत नसतील, त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसेल तर तर चीन पाकिस्तान करील काय?
शेतकऱ्यांना जाणिवपूर्वक ताटकळत ठेवणे याला सेवा म्हणायची का?हे नोकर स्वताला शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेतात आणि शेतकऱ्यांना आत्महत्या पर्यंत हैराण करतात.
पगार घेणे, लांच घेणे तरीही काम न करणे,हे मानवी कृत्य नाही.राक्षसी वृत्ती आहे.
मी आताच नाशिक भुमि अभिलेख संचालक इंगळे साहेब, जळगाव भुमि अभिलेख अधिक्षक मगर साहेब यांचेशी बोललो.त्यांनी कामचोरीचे प्रश्न फक्त जामनेर भुमि अभिलेख चे शिरस्तेदार श्री कदम यांना केले.
भुमि अभिलेख नोकरांना येथे मिटींग साठी वेळ मिळाला पण शेतकऱ्यांची निहीत,विहीत, अधिकृत कामे करण्यासाठी वेळ नसेल का?येथे पगार, प्रवासभत्ता वगैरे घेतीलच.मिटींगचा खर्च दाखवून रात्री दारू मटण होईल.तितकी लांच तर आम्ही शेतकरी सुद्धा देतोच.तर मग आमची लाच घ्या आणि वेळेवर काम करा!
कामचोरी आणि लांचखोरीला सीमा असते.डोक्यावरून पाणी वाहू लागले कि शेतकऱ्यांना राग येणारच.
हे नोकर सांगतात कि आम्ही शेतकऱ्यांची संतान आहोत.तर मग बीज आणि रक्त सुद्धा शेतकरीचे असले पाहिजे.जर तसे असेल तर हे शेतकरी बापाशी गद्दारी करीत आहेत.मला खात्री आहे कि शेतकऱ्यांची खरी औलाद शेतकऱ्यांशी गद्दारी करणारच नाहीत.
शेतकरी यांचा बाप असल्याचे सांगून शेतकऱ्यांची लुटमार करणे,वेठीस धरणे भोंदुगिरी आहे. बदमाषी आहे. हरामखोरी आहे. गद्दारी आहे. मग तो आमदार असो कि मंत्री असो किंवा नोकर असो!
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२














