


रोशन मदनकर (उपसंपादक, मो. 88886 28986)
ब्रम्हपुरी :- चंद्रपूर जिल्ह्यातील आणि गडचिरोली विभागांतर्गत ब्रम्हपुरी आगार व्यवसायाच्या दृष्टीने अव्वल क्रमांकावर असून महत्वाचे ठिकाण आहे.ब्रम्हपुरी आगारातून लांब टप्प्याच्या गाड्या सोडण्यात येतात.मात्र या आगाराला गाड्यांची कमतरता असल्यामुळे प्रवास्यांची तसेच ब्रम्हपुरी आगारातील कर्मचाऱ्यांना गैरसोय व इतर समस्यांना सामोरे जावे लागत होते.वेळेवर गाड्या उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत होते.ही अडचण लक्षात घेता ब्रम्हपुरी येथील सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार प्रशांत डांगे यांनी मागील दोन वर्षापासून संबंधित विभाग ,मंत्री यांचे कडे ब्रम्हपुरी आगाराला नवीन बसेस मिळावे यासाठी पत्रव्यवहार केले होते नुकतेच नाम .प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र शासन तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक परिवहन विभाग मुंबई यांना ब्रम्हपुरी आगाराला नवीन बसेस मिळण्याची पत्राद्वारे मागणी केली होती.तसेच प्रशांत डांगे यांनी माननीय खासदार नामदेव किरसान , सांसद चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र ,विद्यमान आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शिफारस पत्र देऊन मागणी करावी तसेच माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांना सुद्धा आपण देखील पत्रव्यवहार करावा अशी विनंती केली होती. ..प्रशांत डांगे यांच्या सतत पाठपुराव्याने अखेर त्यांच्या मागणीला यश मिळालेले असून दिनांक १६ तारखेला पहिल्या टप्प्यात ब्रम्हपुरी आगाराला नवीन पाच बसेस मिळालेल्या आहेत तर उर्वरित पाच बसेस दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत डांगे यांच्या सतत केलेल्या पाठपुराव्याने ब्रम्हपुरी आगाराला पाच बसेस मिळाल्या मुळे प्रवाशांनी आणि ब्रम्हपुरी आगारातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले आहेत.














