


राजुरा 9 एप्रिल
श्री कन्यका माता मंदीर गडचांदूर येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे बाल सत्कार उपक्रम घेण्यात आला. तनिश पोतनूरवार हा दहा वर्षाचा मुलगा ज्याने गडचांदूर येथे शंभर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला व त्यांना जगविण्यासाठी तो रोपाची काळजी पण घेतो. आता पर्यंत त्याने ४६ वृक्ष लावली आहे. सौ. माधुरी पोतनुरवार (आई) यांच्या प्रेरणेने तो पर्यावरण प्रेमी बनला आहे. वाढते तापमान व दुषित हवामान हे आरोग्यास हानिकारक असुन यावर आत्ताच उपाय करने गरजेचे आहे . अशी समज घेऊन तो गावातील मोकळ्या जागा शोधून तिथे झाडे लावुन संवर्धन करत आहे. तनिशच्या
या कार्याची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महिला टीम नी तनिश चा सत्कार केला. यावेळी नेफडो संस्थेच्या कोरपणा तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, उपाध्यक्षा अरुणा सालवटकर, सचिव विजया नामेवार , शहर संघटिका सुलभा कुरेकार, शितल धोटे, स्मिता विरुटकर, माधुरी पोतनुरवार , अपर्णा उपलंचीवार व महिलाच्या उपस्थितीत तनिश चा शॉल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
———————————————
सौ. उषा टोंगे, कोरपना तालुका महिला अध्यक्षा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था
बालवयात पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड असे उपक्रम जोपासणे कौतुकास्पद असून यामुळे भविष्यातील प्रेरणादायी पिढी तयार होईल. तनिश ने दहाव्या वर्षी केलेला संकल्प तो नक्कीच पूर्ण करेल त्यात आम्ही सर्वच त्याला सहकार्य करू. वाढती उष्णता व प्रदूषण याकरिता प्रत्येकानी आपले कर्तव्य समजून वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन उषा टोंगे यांनी केले.
———————————————














