Home महाराष्ट्र प्रभु श्रीरामनवमी च्या पावन पर्वानिमीत्य कोरपना नगरीत हिंदू-मुस्लीम एकतेचे घडले दर्शन. –...

प्रभु श्रीरामनवमी च्या पावन पर्वानिमीत्य कोरपना नगरीत हिंदू-मुस्लीम एकतेचे घडले दर्शन. – युवा प्रतिष्ठानच्या नेतृत्वात निघाली भव्य शोभायात्रा.

232

.
राजुरा 9 एप्रिल
प्रभू श्रीरामनवमीच्या पावन पर्वानिमीत्त कोरपना नगरीत युवा प्रतिष्ठान च्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीराम अयोध्या झाकी ग्रुप, मध्यप्रदेशातील सुप्रसिद्ध एम.पी.किंग, श्री विजय धुमाळ, बैतुल मध्यप्रदेश घुमाद पारी, व शोभायात्रेचे विशेष आकर्षण झारखंड येथील श्री. बाहुबली हनुमान झाकीचा व वेगवेगळ्या देखावे याचा भव्यदिव्य समावेश यात बघायला मिळाला . सदर शोभायात्रा हनुमान मंदीर बसस्टॉप ते श्रीराम मंदीर पर्यंत काढण्यात आली. भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन युवा प्रतिष्ठाचे अध्यक्ष नितीन बावणे यांच्या पुढाकारातून व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावने यांच्या मार्गदर्शनातुन करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता युवा प्रतिष्ठानच्या संपूर्ण सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शोभायात्रे दरम्यान चौका चौकात अल्पापोहार, महाप्रसादाचे आयोजन करायात आले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समस्त मुस्लीम कौमी एकता मंच च्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. श्रीराम नवमी मिरवणुकीचे मुख्य आयोजक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन बावणे, मार्गदर्शक विजयराव बावणे, श्रीराम मंदीराचे मुख्य पुजारी गिरडकर काकाजी, श्रीराम मंदीराचे समिती चे अध्यक्ष सतिश गज्जलवार यांचे मुस्लीम कौमी एकता मंच कोरपना च्या वत्तीने स्वागत व
सत्कार करण्यात आला. यावेळी मुस्लीम समाजाचे – अ.वहाब भाई ,जमिरुल्ला बेग , सय्यद शौकत अली, मोहसीन भाई, सय्यद साजिद अली, सुफीयान शेख, फैजान पारेख, मुझाहीद भाई, सलौद्दीन भाई, मेहमूद भाई, नदीम अली, सरफरोश शेख, तहूर शेख, अनिस शेख, फरहान शेख ,नवाजिश जगन, रमजान भाई, निसार भाई नगरसेवक, मोहम्मद भाई नगरसेवक, इस्माईल भाई उपनगराध्यक्ष उपस्थित होते.
कोरपना येथील शोभायात्रेत हिंदू-मुस्लीम भाईचाराचा, सामाजीक ऐक्याचे दर्शन घडून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here