Home महाराष्ट्र साकोलीत “श्रीराम नवमी” शोभायात्रेला उसळला जनसागर “नागा साधू अघोरी कला” व...

साकोलीत “श्रीराम नवमी” शोभायात्रेला उसळला जनसागर “नागा साधू अघोरी कला” व श्री केदारनाथ मंदिर होते प्रमुख आकर्षण

256

 

साकोली : श्रीराम नवमी शोभायात्रा समिती साकोली सेंदूरवाफा वतीने निघालेल्या शोभायात्रेला चौकाचौकात जनतेचा जनसागर लोटला होता. येथे छिंदवाडा ( म. प्र.) चे “नागा साधू अघोरी कला” हे दृष्य पाहून शहरवासी भक्तीभावाने प्रफुल्लित झाले होते. तर लाखांदूर रोड न्यायालय चौकात श्रीराम हिंदू युवा मंच कडून “श्री केदारनाथ मंदिर” प्रतिकृती व भव्य भोजन महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या शोभायात्रेत विविध सजावटींचे सादरीकरण केले होते.
श्रीराम नवमी निमित्त गोवर्धन चौकात रवि. ता. ०६ ला सायं. ६ वा. शहरातील पहिली प्रतीमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आमदार नाना पटोले यांचे हस्ते पुजन व अनावरण करण्यात आले. सेंदूरवाफा येथून निघालेल्या भव्य दिव्य शोभायात्रेला चौकाचौकात महिला पुरुष जनतेचा जनसागर लोटला. येथे “नागा साधू अघोरी कला”, गौमाता प्रतिकृती, महाबली हनुमान, अशोक वाटीकेत माता सीता, रथावर स्वार प्रभु श्रीराम माता सीता, लक्ष्मण, हनुमान अश्या दहा ते बारा विविध सजावट झांकीने सेंदूरवाफा साकोलीकर भारावले होते हे विशेष. जागोजागी विविध संघटनांनी शरबत व थंड पाण्याची व्यवस्था केली होती. शोभायात्रा सेंदूरवाफा, प्रगती कॉलनी चौक, बसस्थानक, नगरपरिषद चौक, श्री दूर्गा मंदिर चौक, गडकुंभली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जूने पंचायत समिती, न्यायालय / गोवर्धन चौक मार्गे लाखांदूर रोड तलाव वार्ड श्रीराम भक्त हनुमान मंदिर येथे समापन होत महा आरतीने सांगता झाली व येथे फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली.
या भव्य दिव्य शोभायात्रेला श्रीराम नवमी शोभायात्रा समिती साकोली सेंदूरवाफा येथील संयोजक राजू दूबे, सागर पुस्तोडे, गजेन्द्र कोसलकर, राजेश कापगते, आशिष गुप्ता, प्रणित नशिने, महिपाल राजपुरोहित, रवी अग्रवाल, अमोल हलमारे, मनिष कापगते व सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. येथे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण, पोलीस निरीक्षक एम. पी. आचरेकर, सहा. पोलीस निरीक्षक दिपक वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडुले, उपनिरीक्षक मित्तरवार आणि पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार, पोलीस हवालदार, महिला पोलीस, वाहतूक पोलीस आणि होमगार्ड पथकांनी शोभायात्रेत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महामार्गावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here