Home शैक्षणिक साकोलीची रूंजी राज्यात प्रथम साकोलीसाठी गौरवाची बाब ; २०० पैकी २००...

साकोलीची रूंजी राज्यात प्रथम साकोलीसाठी गौरवाची बाब ; २०० पैकी २०० गुण • जि. प. प्राथ. शाळा क्र. २ ची आहे विद्यार्थीनी

487

 

साकोली : शहरातील जिल्हा परिषद इंग्रजी प्राथमिक शाळा क्र. २ येथील इयत्ता दूसरीची विद्यार्थीनी रूंजी संग्रामे ही भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत २०० पैकी २०० गुण घेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे. ही साकोलीसाठी अत्यंत गौरवाची बाब असून सर्वप्रथम साकोली गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी त्या मुलीचे विभागातर्फे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.
जानेवारी २०२५ ला भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता २ रीची रूंजी सुधाकर संग्रामे हिने अक्षरशः २०० पैकी २०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान राखला. ही साकोली शहरासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. रूंजी संग्रामे ही शासकीय शाळेतील विद्यार्थीनीने महाराष्ट्रात साकोलीचे नाव चमकविले त्याबद्दल पंचायत समिती, जि. प. शाळा साकोली केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, सहा. शिक्षक पल्लवी लुथडे, पी. एस. देशपांडे, उमेश भस्मे, आशा वलथरे, लता इळपाते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगराज मुंगमोडे, उपाध्यक्ष सौ. बावणे, जि. प. केंद्रीय शाळा मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, शिक्षक एम. व्ही. बोकडे, चेतन बोरकर, टी. आय. पटले, चित्ररेखा इंगळे, शालिनी राऊत, श्रद्धा औटी आणि साकोली मिडीया नेटवर्क व समस्त पंचायत समिती शिक्षकवृंद यांकडून रूंजी संग्रामे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here